वाई तालुक्यातील ओबीसी समाज बाधवांनी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार मॅडम सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, यासाठी वाई तालुक्यातील वीस हजार हरकती घेऊन २६ जानेवारी २०२४ रोजी ओबीसी समाजाला अंधारात ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी डॉ. अमर जमदाडे, सुरेश कोरडे, प्रा . शेखर फरांदे, संपतराव सपकाळ, डॉ .मकरंद पोरे , बापूसाहेब जमदाडे, नानासाहेब शिंदे, शिवाजी टिके,राहुल सुतार, कैलास जमदाडे, ॲड.रामदास सपकाळ, चंद्रकांत कुंभार, अशोक सूर्यवंशी, कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा