समाजाच्या विविध स्तरातून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद (प्रतिनिधी नारायण सोनटक्के)
साईबाबा प्राथमिक शाळेतील सहशिक्षक धोंडिबा गंगाराम गायकवाड हे गेल्या १७ वर्षापासून सेवा करीत आहेत. शाळेत विविध उपक्रम, स्काऊट गाईड मास्टर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ भाषा अभ्यास गट सदस्य बालभारती पुणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन नानक साई फाउंडेशनच्या घुमान साहित्य सभेत संत नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नांदेड येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्ता मामा येवते, मुख्याध्यापक अमृतवाड बि.आर. भाजपा जेष्ठ नेते व्यंकटराव पाटील चांडोळकर, फुले शाहू आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते तथा येसगी माजी सरपंच गंगाधर प्रचंड, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष जि.पी.मिसाळे, बहुभाषिक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गंगाधर धडेकर, वस्तीगृह अधिक्षक चंदर मिसाळे, उपमुख्याध्यापक रामेश्वर गायकवाड,मुअ प्रफुल्ल टाकळीकर, पत्रकार लक्ष्मण तुरेराव, सुदर्शन वाघमारे, सिध्दार्थ वाघमारे, राहुल वाघमारे , गंगाधर कांबळे बावलगावकर, नारायण सोनटक्के, भुजंगराव वाघमारे, चांडोळकर, केरबाजी गायकवाड, विजय टोम्पे, प्रल्हाद टोम्पे , गंगाधर सिरसे सुगाव, यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा