वाणिज्य व व्यवस्थापन या विषयावर सादर केला होता शोधप्रबंध
शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
किसन वीर महाविद्यालयामधील प्रा. रवींद्र सुरेश जमदाडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची, वाणिज्य व व्यवस्थापन या विषयामध्ये पी.एच.डी. पदवी प्राप्त झाली या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय मदनदादा भोसले, संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, संस्थेचे खजिनदार प्रा. नारायण चौधरी, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. विनोद वीर तसेच सर्व प्राध्यापक वृंद तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी अभिनंदन केले. एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देऊन, परिस्थितीशी संघर्ष करून ही पदवी प्राप्त केली यासाठी त्यांना डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट पुणे येथील प्रो. डॉ. ई.बी. खेडकर तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या प्रवासामध्ये डॉ. रवींद्र जमदाडे यांचे आई-वडील तसेच कुटुंबातील सर्व सदस्य यांचे पाठबळ लाभले यामुळेच त्यांनी हे यश संपादित करू शकले. एका शेतकरी कुटुंबातील, सर्वसामान्य घरातील व्यक्ती शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी मिळवतो ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
रवींद्र जमदाडे यांनी मिळवलेल्या या बहुमानामुळे परिसराच्या नावलौकिकात भर पडली असून, उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील तरुण-तरुणींसाठी त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. सरांच्या जडणघडणीमध्ये जनता शिक्षण संस्थेचे तसेच किसन वीर महाविद्यालयाचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. सर या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत तसेच ते या ठिकाणी वाणिज्य व व्यवस्थापन विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत सरांची वाटचाल ही इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे विशेष अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा












