गावाच्या भरभराटीसाठी व आरोग्यासाठी प्रार्थना
शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
ओझर्डे येथील सामाजिक बांधिलकी जपणारे 'श्री सहयोग गणेशोत्सव मित्र मंडळ' आयोजित गणेशोत्सवाला वाईचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी भेट देऊन श्री गणेशाचे भाविक वातावरणात दर्शन घेतले. त्यांच्या या भेटीमुळे मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
मंडळात आगमन होताच नगराध्यक्ष अनिल सावंत यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण गावाच्या भरभराटीसाठी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले, "सहयोग गणेशोत्सव मित्र मंडळ हे केवळ उत्सव साजरा करत नाही, तर त्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि तरुणांना एकत्र आणण्याचे अत्यंत स्तुत्य काम करत आहे. उत्सवाच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम हे इतर मंडळांसाठी प्रेरणादायी आहेत."
या प्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत, वाईचे उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के महिलाच्या वतीने जि. प. सदस्या वृषाली चव्हाण यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











