maharashtra day, workers day, shivshahi news,

समाज नाचायला नाही तर वाचायला शिकवण्याचं काम विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे - शिवव्याख्याते यशवंत गोसावी

व्याख्यानमालेस पंढरपूरकरांचा उदंड प्रतिसाद दिला
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti , Yashwant Gosavi, Shiv Vyakhya , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त तिसर्‍या दिवशी व्याख्याते श्री.यशवंत गोसावी याचं व्याख्यान शिवतीर्थ, पंढरपूर येथे संपन्न झाले. शिवरायांचा धगधगता इतिहास समाजापुढे मांडून समाजाला दिशा देण्याचे कार्य या व्याख्यानातून साध्य झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे आणि विचारांचे दर्शन जीवनातील यश मिळविण्यासाठी प्रेरणादायी ठरते. शिवरायांचे जीवन आणि विचार दर्शन घडवण्याचा हेतू या व्याख्यानमालेने पूर्ण होत आहे. पंढरपूरकरांनी १५ ते १७ अशा तीन दिवसीय व्याख्यानमालेस उदंड प्रतिसाद दिला.
पंढरपूर मधील नागरिकांसाठी सातत्याने काही नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणारे श्री.अभिजीत आबा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आणि आचाराचे दर्शन घडवणाऱ्या व्याख्यानमालेचे आयोजन सुरू केले. गेली अनेक वर्षे ते हा उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करत असून त्याचा प्रत्यक्ष परिणाम पुढील पिढीवर होईल हा विश्वास आहे.

या अभिनव उपक्रमाचे पंढरपूरवासियांकडून तर कौतुक होतच आहे, परंतु सुप्रसिद्ध वक्त्यांनी देखील श्री.अभिजीत आबा पाटील यांच्या कार्याची विषेश दखल घेतली आहे. "आज छत्रपती असते तर बंद पडलेले कारखाने सुरू करण्यासाठी (लोकांच्या हिताचे) अभिजीत पाटील यांना सोन्याचे कडे दिले असते" असा गौरवपूर्ण उल्लेख शाहीर राजेंद्र कांबळे यांनी केला. 
आता या अभिनव व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान प्रेरणादायी वक्ते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे आयोजित करण्यात आले आहे. कासेगाव येथे दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६:०० वाजता सर्वांनी मोठ्या संख्येने या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यावेळी मा.नगराध्यक्ष, शहराध्यक्ष सुभाष भोसले, स्वेरीचे सचिव डाॅ.बी.पी.रोंगेसर, दिपक पवार, मधुकर आबा नाईकनवरे, आनंद माळी, काशिद रावसाहेब, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, सुरजनाना भोसले, व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, संचालिका सविता रणदिवे, शुभांगी भुईटे, मुंढे मॅडम, चारूशिला कुलकर्णी, संचालक तानाजी बागल, सचिन पाटील यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !