maharashtra day, workers day, shivshahi news,

ढगा शेत शिवारात नंदकिशोर शेगोकार व अमर नाथे यांच्या शेतात विघ्न संतोषी अज्ञात इसमाने लावली आग

आग आटोक्यात आणली व फार मोठी वित्तहानी टळली
A fire was set in the Shivara field , Acola , shivshahi news.



शिवशाही वृत्तसेवा, अकोला जिल्हा प्रतिनिधी, संजय क्षीरसागर
      दर्यापूर रोड लगत असलेल्या ढगा शेत  शिवारात तीन ठिकाणी अज्ञात विघ्न संतोषी इसमाने  आग  लावून शेतातील हरभरा जाळण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अगोदर नाल्याच्या कडेला तीन ठिकाणी ताडाच्या झाडाला आग लावली त्या मुळे ती आग ताडाच्या झाडा सोबत इतर बाजूने पसरत अमर नाथे   यांच्या शेतातील लिंबूच्या बगीचाच्या  कडेला पसरली नंतर ती आग पसरत  नंदकिशोर शेगोकार यांच्या पण शेताच्या  कडेला पसरले सुदैवाने ही आग हरभऱ्याला लागली नाही जर ही आग पसरली असती तर आशिष काळे व अजय काळे,नितीन काळे यांच्या शेतातील संपूर्ण हरभरा अमर नाथे यांचा निंबाचा बगीचा  जळून खाक झाला असता व फार मोठी वित्त हानी झाली असती. 

ही बाब जशी निदर्शनात येताच  नंदकिशोर शेगोकार,संजयजी बोरोडे व अतुल निमकर यांनी त्वरित  अग्निशामक दल बोलावून ही आग आटोक्यात आणली व फार मोठी वित्तहानी टळली. सर्व शेतकऱ्यानी जोपर्यंत पीक शेतात आहे तोपर्यंत या उन्हाळ्याच्या दिवसात सकाळ, दुपारचे व संध्याकाळचे वेळेस चक्कर मारणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळेच अशा विघ्न संतोषी लोकांना आळा बसेल अशी विनंती ढगाशेत शिवारातील शेतकरी करतात. आग आटोक्यात आणली व फार मोठी वित्तहानी टळली

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !