छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे हजारो नागरिकांनी दर्शन घेतले
शिवशाही वृत्तसेवा, आरिफ शेख सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी
सिंदखेडराजा येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सिंदखेडराजा तालुक्यातील शेलु, धांदरवाडी, वसंत नगर, नाईक नगर, डावरगाव, अंचली, मीराबाई फाटा, नशिराबाद, सावरगाव, ते राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळ पर्यंत भव्य मिरवणूक निघाली होती. ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडण्यात आले होते. राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे हजारो नागरिकांनी दर्शन घेतले.
आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी, माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर नगराध्यक्ष सतीश तायडे शिवजयंती जन्मोत्सवाचे अध्यक्ष डॉ. बालाजी कळकुंबे पाटील यांच्यासह असंख्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले, उपस्थित कार्यकर्त्यांनी याप्रसंगी जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा दिल्या तसेच मसालाभात आणि पाणी यांचे सुद्धा वाटपकरण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन छावाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, गोविंद टेके, बाळासाहेब शेळके, दीपक शेळके, दीपक किंगरे, चंदू साबळे, संदीप देशमुख, शिवा पुरंदरे, अशोक भुतेकर, गोकुळ सर, विनोद सोळंके, चरण सिंग राजपूत, विनोद भुतेकर, अर्जुन जाधव, निवृत्ती कठोरे, निलेश देशमुख, आणि त्यांचे सहकारी यांनी केले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा