मंदिर समितीच्या वतीने कुटेंचा सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस श्री.तुकाराम नाथराव कुटे या दानशुर भाविकाने रूपये एक लाख इतकी देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीचे कर्मचारी श्री.योगेश कागदे यांच्या शुभहस्ते श्रींचा फोटो, उपरणे, लाडू प्रसाद देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
श्री.तुकाराम कुटे हे गुळज ता. गेवराई जि. बीड येथील रहिवाशी असून सर्वसामान्य शेतकरी वारकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. त्यांनी यापूर्वी देखील मंदिर समितीस देणगी दिली होती. विठ्ठल भक्ती समोर कोणत्याही धनदौलतीचे महत्त्व नाही. त्यामुळे विठ्ठलाने दिलेले विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो अशा भावना तुकाराम कुठे यांनी व्यक्त केल्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा