कार्यक्रमासाठी पालकवर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवशाही वृत्तसेवा, सोयगाव तालुका प्रतिनिधी रईस शेख
पाडळी .. रामरक्षा इंग्लिश स्कूल पाडळी शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थी आदित्य धायडे हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत तर एक विद्यार्थीनी राजमाता जिजाऊ, राणी सईबाई, मावळे, आदि यांच्या वेशभूषेत येऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे संचालक सुरेश पवार यांनी सांभाळले होते शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच बालक विद्यार्थ्यांनी भाषणे, पोवाडे, गीते सादर केले. शाळेचे मुख्यध्यापक निलेश पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे विभाग प्रमुख तसेच सुरेश पवार सर यांनी नियोजन तसेच सूत्र संचलन केले .
शाळेतील शिक्षक तायडेसर कपिलसर मोहितेसरविर भाऊ सर साळवे सर सपकाळ सर जाधव सर खान सर खुर्दे मॅडम धायडे मॅडम झुंबड मॅडम इंगळे मॅडम सपकाळ मॅडम मगर मॅडम कारेकर आंटी येगळ आंटी रमेश गायकवाड रमेश सोनुने गजानन गायकवाड आदिंनी कार्यक्रम पार पाडला. व कार्यक्रमासाठी पालकवर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा