वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ घेण्याची आव्हान
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर
लातूर, विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा येत्या 10 मार्च 2024रोजी सकाळी 10.00am.वाजता विश्वकर्मा गार्डन फंक्शन हॉल ,बार्शी रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. मागील वर्षी दोन वर्षापासून जगात भयानक परिस्थिती कोहिड रोगाने निर्माण झाली होती. त्यामुळे भारतात लॉकडाऊन लावल्याने माणसाच्या आयुष्यात अनेक समस्यानिर्माण झाल्या आणि जगणे ही मुश्किल होऊन बसले. आता परिस्थिती चांगली झाली त्यामुळे विश्वकर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.यावर्षी विश्वकर्मी वंशीय समाज संघटनेतर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वकर्मीय समाजाततील इच्छुक असलेले डॉक्टर, इंजिनियर्स, सायन्स ,कॉमर्स, पदवी क्षेत्रातील व व्यवसाय करणारे कारागीर यांनी या वधू-वर मेळाव्यास प्रत्यक्ष उपस्थित राहावे.त्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष वधू -वरां चा परिचय हा सर्व समाज बांधवांपर्यंत होईल यासाठी वधू-वराने प्रत्यक्ष उपस्थित राहावे असे आव्हान लातूर जिल्हा अध्यक्ष अनंत पांचाळ यांनी केले आहे.नोंदणीसाठी संपर्क सुदर्शन बोराडे मो.नं. 7588018828 व अनंत पांचाळ मो.नं.9850641554 या नंबर वरती संपर्क साधावा असे आव्हान सुदर्शन बोराडे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा