पुढील महिन्यात सदर रस्त्याचे काम पुर्ण
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे रखडलेल्या 500 मीटर रस्त्याच्या कामाबाबत माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मध्यस्थी केल्यामुळे सदर रस्ता पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंढरपूर शहराच्या दृष्टीने रिंगरोड होणेसाठी गेली तीन ते चार वर्षापासून मा.आ.प्रशांत परिचारक प्रयत्न करत होतो. त्याअनुषंगाने तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत वाखरी ते कोर्टी (लक्ष्मी टाकळी) मंजूर करण्यात आला होता. त्याचे भुमीपुजन कार्तिकी एकादशी निमित्त मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. सदर रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. परंतू वाखरी येथे 500 मीटर अंतराचा रस्त्याचे काम पुर्ण झालेले नाही होणार
तेथील काही शेतकऱ्यांची जमीन भुसंपादन झाली आहे त्याचा मोबदला मिळत नसल्याने सदर रस्त्याचे काम रखडलेले होते. यावेळी वाखरी येथील काही शेतकरी मा.आ.प्रशांत परिचारक यांच्याकडे आले असता शेतकऱ्यांची बाजु पुर्णपणे ऐकून घेतली. व तेथील शेतकऱ्यांना वाढीव भुसंपादन झालेल्या जमीनीचा मोबदला मिळाला पाहिजे यासाठी मा.श्री.कुमार आर्शिवाद जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या समवेत चर्चा करून वाढीव मोबदला मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात यावा अशी मागणी मा.आ.प्रशांत परिचारक यांनी केली असता जिल्हाधिकारी यांनी त्या शेतकऱ्यांना वाढीव भुसंपादन झालेल्या जमीनीचा मोबदला मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आश्वासन दिले व हा रस्ता पुर्ण करण्याचे सुचना सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आल्या आहेत.
तसेच वाखरी येथील शेतकऱ्यांनी जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊन सदर रस्ता विनाअडथळा पुर्ण करून द्यावा यासाठी मा.आ.प्रशांत परिचारक प्रयत्न करत होते. त्यास यश मिळाले असून वाखरी बायपास येथील 500 मीटरचा रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुढील महिन्यात सदर रस्त्याचे काम पुर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार आहे. पंढरपूर शहरातील लिंक रोड, इसबावी येथील वाहतूक कोंडीचा होणारा त्रास सुटणार असून वाहतूकीची ये-जा बायपास मार्गी होणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा