ना. आठवले यांचे नरसीत जंगी स्वागत
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मुखेडचा रिपाइं आठवले गटाचा मेळावा आटोपून नरसी मार्गे हैदराबाद जात असताना नरसीच्या चौकात भाजपाचे माजी जि.प. सदस्य माणिक लोहगावे. धम्मदीप भद्रे कांडाळकर व सहकाऱ्यांनी ना. आठवले यांचे जोरदार स्वागत केले. रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दि. १६ रोजी मुखेडला पक्षाच्या मेळाव्यासाठी आले होते. नरसीत जाताना त्यांचा जंगी सत्कार करण्याचे नियोजन करुन कार्यकर्ते वाट पाहत बसले परंतु ना. आठवले हे कहाळामार्गे मुखेडला गेले.
त्यामुळे अनेक जण नाराज झाले होते. हे कळाल्यावर खा. रामदास आठवले यांनी मुखेडचा दौरा आटोपून हैदराबाद जाताना नरसी मार्गे ताफा वळविला. धम्मदीप भद्रे कांडाळकर आणि अनेक कार्यकर्त्यांनी खा. आठवले यांचा जंगी सत्कार केला. रिपाइं कार्यकर्त्यांनी नरसी चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
यावेळी नरसीचे माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर, जाफर, सुभाष पेरकेवाड, डॉ. संतोष उच्चेकर, अजीम शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जोंधळे, मिलिंद बच्छाव, नरसी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ताफा येण्यासाठी सहकार्य करून.आठवले साहेबांचे पिए.मा. हेमंत रनपिसे सर,मा. पोपटशेट घनवट साहेब महाराष्ट्र अध्यक्ष , व्यापारी आघाडी , मा .सचिन वाघमारे साहेब ,महाराष्ट्र प्रदेश सचिव, व्यापारी आघाडी , मा. वैजनाथ पाटील मुगावकर सर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व्यापारी आघाडी याचे आठवले साहेब यांच्या दौऱ्यामध्ये उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा