maharashtra day, workers day, shivshahi news,

प्रतिभा निकेतन महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या यावर अंतर्दृष्टीपूर्ण प्रतिभा व्याख्यानमाला

समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेणे व्याख्यानाचे उद्दिष्ट 
Lecture series on problems of senior citizens , Pratibha Niketan College , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर 
१८ जानेवारी २०२४ प्रतिभा निकेतन महाविद्यालयात आय. सी. टी हॉलमध्ये दुपारी 2 वाजता प्रतिभा व्याख्यानमालेचे 14 वे पुष्प प्रा. डॉ. जीवन चव्हाण यांनी भारतीय समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या या विषयावरील व्याख्याना ने गुंफले. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी विषयांवर  प्रतिभा व्याख्यानमालेद्वारे विचार मंथन केल्या जाते. प्रास्ताविकेत प्रा. डॉ. स्वाती तांडे यांनी समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेवून त्यांचे निराकरण करणे हा आजच्या व्याख्यानाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 
 प्रा. डॉ. जीवन चव्हाण यांनी या विषयाची सखोल माहिती देऊन भारतातील ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या विविध समस्या त्याची कारणे आणि उपाय इत्यादी पैलूंवर प्रकाश टाकून सद्यः स्थितीतील ज्वलंत प्रश्नावर भाष्य केले. प्रा. डॉ. चव्हाण यांनी वास्तविक जीवनातील उदाहरणे आणि सांख्यिकीय  माहिती देऊन वृद्ध लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक समस्यां विषयी जागरूकता निर्माण केली.
 
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर गंगाखेडकर होते. व्याख्यानमालेचा समारोप आलोक सरोदे,  यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.  दिलीप स्वामी, डॉ. राहुल वरवंटिकर, डॉ.नीलकंठ पाटील, डॉ. लाठकर, डॉ. राऊत, डॉ. ममता मालवीया, डॉ.जयश्री देशमुख, डॉ. वैशाली गोस्वामी, डॉ. डी एस वाघमारे, डॉ.मारोती लुटे, डॉ जि टी वाघमारे, कार्यालय अधीक्षक श्री. राजेश अयंगार, डॉ.पराग साले, डॉ.राजेश कुंटूरकर, प्रा. प्रवीण स्वामी, प्रा. प्रवीण सावंत, प्रा घोंगडे, श्री. शिवाजी वाडीकर, श्री. संजय हजारें सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद आणि बरेच विद्यार्थी उपस्थित  होते. ज्वलंत विषयां वरील व्याख्यानांने उपस्थितांना ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी ते काय भूमिका बजावू शकतात याबद्दल सखोल विचार करण्यास प्रेरित केले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !