रामजन्मभूमी मंदिरासाठी कारसेवकांचे योगदान - राजेंद्र हलवाई, डॉ.राम हाराळ
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली - रामजन्मभूमी मंदिराला पूर्व वैभव मिळवून देण्यासाठी अनेक कारसेवकांनी योगदान दिल्याबद्दल अशा कार सेवकांचा सोमवारी सत्कार करण्यात येणार असल्याचे राजेंद्र हलवाई, डॉ. राम हाराळ यांनी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (ता.२२) रोजी गांधी चौक येथील धडवाई हनुमान मंदिरात सायंकाळी सात वाजता केले आहे. हिंगोली येथून शेकडो कारसेवक अयोध्येत गेले होते. अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, त्यापार्श्वभूमीवर हिंगोली येथे कार सेवकांचा सन्मान केला जाणार आहे. हिंगोली येथील कार सेवकांनी राजेंद्र हलवाई यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा