निवेदनाद्वारे भोई समाजाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
प्रियंका नलावडे , राजवीर नलावडे मृत्यू प्रकरणी दोषी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रीय भोईसमाज क्रांती दलाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की, नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कुदळा येथील एका भोई समाजातील प्रियंका नलावडे व त्यांचा मुलगा राजवीर या दोघांनी दोन जानेवारी रोजी भीमा नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. मात्र मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत तिचे पती विक्रम नलावडे यासह सासू, सासरे तसेच अन्य तिघेजण माझ्या व मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. सासू, सासरच्या जाचाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.त्यामुळे पीडित महिलेस न्याय मिळवून द्यावा व मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
निवेदनावर कैलास श्रीनाथ, बजरंग आडने, बाबुराव नेमाडे, श्याम नेमाडे, आकाश संदुसे ,सखाराम नेमाडे, वंश करवंदे, शंकर नेमाडे, मुकेश करवंदे, अमोल आडणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा