नवे वाळू धोरण फसवण्याचा प्रयत्न
सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू देण्यासाठी राज्य सरकारने नवे वाळू धोरण अमलात आणले आहे. मात्र हे धोरण कुचकामी ठरवण्यासाठी वाळू ठेकेदारांनी अतिशय पद्धतशीरपणे प्रशासनाला गोत्यात आणायचा प्रयत्न चालवला आहे. आणि प्रशासनाच्या या धोरणाची वाळू लिलावात अक्षरशः टिंगल केली आहे.
गेल्या वर्षी प्रशासनाने केलेल्या वाळू लिलावात अपेक्षित उपसा झालाच नाही त्यामुळे ठेकेदारांनी ठरवून नवे वाळू धोरण फेल घालवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यासाठी ठेकेदारांनी अतिशय कमी रकमेचे टेंडर भरल्याचे दिसून आले यामध्ये वाळू उपसा करून तो डेपोपर्यंत आणणे अशक्य असल्यामुळे यातून प्रशासनाचे टिंगल करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते.
पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे ठेकेदारांनी लिलावात सहभाग घेतला नसल्याने तिथे रीटेंडर करण्याची वेळ आली आहे तर शेवटी आणि मिटकलवाडी येथील लिलावात एकाही ठेकेदाराने सहभाग घेतलेला नाही.
एकीकडे सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात वाळू देण्यासाठी सरकारने धोरण राबवले आहे तर दुसरीकडे वाळू ठेकेदारांनी प्रशासनाच्या या निर्णयाला अडसर निर्माण करण्याची रणनीती केली आहे. थोडक्यात वाळू माफियाला मनमानी करण्यासाठी प्रशासनाचे धोरण कुचकामी ठरवण्याचे जोरकस प्रयत्न वाळू ठेकेदारांनी चालवल्याचे यातून दिसत असून, यावर आता प्रशासन काय भूमिका घेते आणि कसा तोडगा काढते याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे
सचिन कुलकर्णी
संपादक
शिवशाही न्यूज नेटवर्क
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा