तरूण वर्गाने सहभाग नोंदवावा आणि अध्यात्माची कास धरावी - लक्ष्मीकांत पाठक
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली श्री सद्गुरू सेवा समिती सामुहीक अनुष्ठान अंतर्गत व श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा निर्विघ्नपणे कार्य पार पडण्यासाठी दि.१४ जानेवारी रोजी हिंगोली शहरातील मंगळवारा परिसरातील राम मंदिर येथे सकाळी ठिक 10 वाजता राम रक्षा पाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्म कार्यात शहरातील महिला व पुरुष वर्गाला श्री सद्गुरू समितीच्या वतीने वेद शास्त्र संपन्न मुख्य पुजारी -श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर हिंगोली लक्ष्मीकांत पाठक यांनी सादर आमंत्रित केले आहे.तसेच जास्तीत जास्त शहरातील महिला व पुरुष सदभक्तांनी राम रक्षेच्या पाठासाठी यावे असे आवाहन देखील श्री सद्गुरू सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा