श्री शिव महापुराण कथेचा सहावा दिवस लाखो भक्तांच्या उपस्थितीत व मंगलमय वातावरणात संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री शिव महापुराण कथेच्या सहाव्या दिवशी श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत अबा पाटील यांनी सहकुटुंब पंडीत प्रदीप मिश्रा महाराजांचे स्वागत केले. आरती व पूजन करून कथेस प्रारंभ झाला.
पंढरपूर आणि भारतातल्या अनेक राज्यातील लाखो भाविक थंडी उन्हाची पर्वा न करता सहभागी होत आहेत. विठ्ठल आणि शिवभक्तीचा हा संगम न भूतो न भविष्यती असाच ठरला.
आज कथा सोहळ्यासाठी आमदार श्री.यशवंतजी माने, आमदार श्री.संदीपजी क्षीरसागर, दामाजी सह.साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन तानाजी खरात, लाइफलाईन हाॅस्पिटलचे डाॅ. संजय देशमुख यांच्या सह वकील, आर्यविश्व कोमटी समाज, परीट समाज, नाभिक समाज यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महाराजांचे दर्शन घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा