उपस्थित मान्यवरांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी आमदार मुटकुळे यांच्या प्रयत्नातून चाळीस लाख रुपये खर्चून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण समारंभ प्रसंगी आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, हिंगोली लोकसभा संयोजक रामदास पाटील, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष दिवाकर माने, आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा हिंगोली यांच्या वतीने दिवाकर माने, सुनील इंगोले, प्रतीक कांबळे, आशिष साठे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, आणि आमदार तानाजी मुटकुळे यांचा सत्कार केला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा