गटशेती चळवळ जोमाने राबविण्यासाठी प्रयत्न
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
गजानन महाराज मंदिर, शिऊर येथे माझा गट माझी चळवळ प्रशिक्षणासाठी बळेगाव, टूनकी, शिऊर, नालेगाव, खंडाळा, जरुळ, भायगाव वैजापूर, लोणी बुद्रुक, आघुर, तलवाडा, या गावांतील 20 गट उपस्थित होते. रिजनल समन्वयक यांनी प्रस्ताविक द्वारे प्रशिक्षणाची सुरवात केली व सर्व गटातील निमंत्रक यांनी गटातील केलेले कामाचे अनुभव सांगीतले. आणि राजेश सर मास्टर ट्रेनर यांनी ब्रँड अँबेसिडर ही फिल्म दाखवून चर्चा घडवून आणली.
यामध्ये फार्मर कप 2024 साठी चांगले गावकरी प्रशिक्षणार्थी कसे निवडावे यासाठी आपण काय केले पाहिजे यावर सखोल मार्गदर्शन केले. आणि आता ही चळवळ कशी पुढे जाणे साठी आपली सर्वांची भूमिका किती महत्त्वची आहे हे सांगितले. तालुक्यात नवीन शेतकरी गटशेती च्या चळवळीत जोडून घेण्यासाठी सर्व गटाने काय काय करू शकतो यावर गटचर्चा करून पुढे येऊन त्याचे सादरीकरण केले.
गणेश सूर्यवंशी ट्रेनर यांनी शपथ देऊन प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली. यामध्ये परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांचा सहभाग होता व गटांनी उत्तम प्रकारे पुढील नियोजन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा