दुर्गाताई बिसंदरे यांच्या नेतृत्वात अखंड ज्योत पदयात्रा व महाआरती संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, अकोला जिल्हा प्रतिनिधी संजय क्षिरसागर
अयोध्या येथील भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त पवित्र ग्रंथ रामायणाचे पूजन
माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी पवित्र ग्रंथ रामायण डोक्यावर घेतले.
अयोध्या येथे तब्बल ५०० वर्षानंतर भगवान श्रीराम यांनी तंबूतुन मंदिरात प्रवेश केल्यामुळे धारणी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा अध्यक्ष दुर्गाताई बिसंदरे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी श्री संत गजानन महाराज मंदिर ते भगवान श्रीराम मंदिरापर्यंत जवळपास अडीच किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली, देशात रामराज्याची पुनरावृती व्हावी, देशात सदभावना, धर्म प्रेम ,शांती,समृध्दी देशभावना आदी गोष्टींना बळ मिळावे.
या उद्देशाने हि अखंडज्योत पद साजरा केल्या जात आहे. यात्रा काढण्यात आली होती. या अडीच किलोमीटर काढण्यात आलेलया या अखंड ज्योतयात्रेचे श्रीराम मंदिराच्या कमेटीतील रतन परिहार, सुनील चौथमल, सुशील गुप्ता, राजकिशोर मालवीय, श्रीराम मालवीय, लाला महाराज, दिनेश धनेवार, राजू राठोड, दीपक मालवीय,पंडित सूर्यप्रकाश मिश्रा, पाराशर बुलबुले, रवी नवलाखे सुशील तिवारी आदी मान्यवरांनी या अखंड ज्योतीचे भव्य स्वागत केल्यावर पवित्र ग्रंथ रामायणाचे पूजन करून भगवान श्रीराम यांची महाआरती करण्यात आली. माजी आमदार प्रभुदास भिलावेकर अखंड ज्योत पदयात्रेत सामील
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा अध्यक्ष दुर्गाताई बिसंदरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या महिलांच्या या अखंड ज्योत पद यात्रेत माजी आमदार प्रभुदास भिलावेकर सामील होवून आपल्या डोक्यावर पवित्र ग्रंथ रामायण ठेवले. या ऐतिहासिक दिवसाला विसरता येणार नाही. आता सनातन धर्माला कोणीही तुच्छ नजरेने बघणार नाही.
या अखंड ज्योत पद यात्रेत दुर्गाताई बिसंदरे, सविता मालवीय,वनमाला मांडळे, ज्योती अवस्थी,अनिता भिलावेकर, मीना बारवाहन, कमला गाडगे शिवरती, गोहळकर ,कलाबाई बडोदे, इंद्राक्षी गोहळकर, बबिता अंकेल,बबिता गोहळकर ,आशा पवार, शकुंतला, सुमन, विमला गावंडे,वृषाली महल्ले, किरण माकोडे, शीतल भारती,शांता जयस्वाल,आशा जयस्वाल,शीतल ठाकूर, मेघा मालवीय,पूजा तारे, राजश्री इंगळे, लीला उंबरकर, रमा,माया ,सुरेखा, दिपमाला,सुनंदा, ममता,सिमा,रजनी ,रिना ,मोनिका शोभा, निंबोकर काकू , नर्मदा गवई, आदी शेकडो महिला सहभागी होऊन अखंड ज्योत पद यात्रा यशस्वी करण्यास श्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा