समाज बांधवांचे तहसीलसमोर आमरण उपोषण
शिवशाही वृत्तसेवा, आरिफ शेख तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा
दुसरबीड येथील ई-क्लास असलेली व वंजारी समाजाला वहिवाटीने स्मशानभूमीसाठी मिळालेली शासकीय जमीन चक्क खोटे दस्तावेज बनवून हडपण्याचा डाव सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आलेला आहे. विशेष म्हणजे, संबंधितांना ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व गटविकास अधिकारीदेखील साथ देण्याचा प्रयत्न करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ही जमीन वंजारी समाजाच्या हक्काची असल्याने तिचे हस्तांतरण थांबवावे. असे शिवानंद सांगळे यांनी म्हटले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा