जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य हिंगोली
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM_JANMAN) अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 15 जानेवारी, 2024 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
aaaa
यावेळी वन हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील हिंगोली उपविभागातील मौजे खेर्डा येथील 04 व जांभरुण आंध येथील 03 पात्र वनहक्क धारकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सदस्य सचिव तथा उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, सदस्य तथा कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे, वन हक्काचे काम पाहणारे जिल्हा सहायक व वनहक्क धारक शिवप्रसाद आवचार उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा