हिंगोली शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना मागील चार वर्षापासून गणवेशच दिल्या नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांना काम करताना त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा रुग्णांच्या नातेवाईकांचा मार खाण्याची वेळही या कर्मचाऱ्यांवर आली आहे.
शासकीय रुग्णालयात चतुर्थ श्रेणी पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पांढरा गणवेश असणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांना रुग्णालय प्रशासनाकडून गणवेशासाठी निधी देखील दिला जातो. कर्तव्यावर येताना कर्मचाऱ्यांनी गणवेश परिधान केल्यामुळे सदर कर्मचारी शासकीय रुग्णालयात कार्यरत असल्याचे लक्षात येते.
मात्र या कर्मचाऱ्यांना मागील चार वर्षापासून गणवेश देण्यात आला नाही तसेच गणवेशासाठी निधीही देण्यात आला नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा सदर कर्मचारी शासकीय रुग्णालयातील आहे की नाही हे ओळखू येत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्यांना मारही बसला आहे. या कर्मचाऱ्यांनी गणवेशाची मागणी केली असता त्यांना निधी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता गणवेशासाठी निधी कधी येणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
साई माऊली संस्थांचे पदाधिकारी तसेच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य निनाजी कांडेलकर यांनी रुग्णालय प्रशासनाने परवानगी दिल्यास या कर्मचाऱ्यांना गणवेश देण्याची तयारी दर्शवली आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा