maharashtra day, workers day, shivshahi news,

नांदेडच्या नंदकिशोर मंजूवाले यांचा बधीरा घोडा ठरला माळेगाव यात्रेचे आकर्षण

आपल्या गटात पटकावले पारितोषिक
Nandkishore Manjuwale's deaf horse became the attraction of the Malegaon Yatra , nanded , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
माळेगाव यात्रेतील पशु प्रदर्शनात नांदेड येथील प्रसिध्द हॉटेलचालक नंदकिशोर अडकटलवार यांचा नामांकित असलेला अलिशान या ब्लड लाईन अश्वाला 'बधीरा' दोन दाताच्या गटात पारितोषीक मिळाले आहे जिल्हा परिषदेच्या अधिकारी मिनल करनवाल यांनी हे पारितोषीक देवुन गौरव केला,पशुधनाची हा अश्व पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
एकेकाळी घोड्यावरुन वाहतुक केली जात होती. हा काळ आता लोप पावत चालला आहे. आता विविध वाहतुकीचे साधन निर्माण झाली आहेत. असे असतानाही आजही देशात घोडे पालन करण्याची हौस मोठ्याप्रमाणात आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेत पशुधनाची स्पर्धा दोन दात वयाच्या स्पर्धेत पारितोषिक पटकावले.
घोडेबाजारात दरवर्षी देशातील विविध भागातील अश्वप्रेमी यात्रेत घोडे खरेदी-विक्री करतात. या यात्रेत देशाच्या विविध भागातून घोडेपालकही सहभागी होतात. यंदा मालेगाव यात्रेत दि १० ते १४ रोजी पर्यंतही यात्रा सुरु होती. या यात्रेत घोड्यांच्या सौंदर्य शर्यती, घोड्यांचे शो,नृत्यासह बऱ्याच प्राण्यांच्या स्पर्धा होतात. अश्व या जातीत मारवाडी त्यात रक्त हा त्या युध्द अश्व ग्रेट
अश्वाला पहिली पसंती दिली जाते. अलिशान ही जात अश्वात श्रेष्ठ समजली जाते. या जातीत अश्वलाईन गटातील घोड्याला जास्त मान मिळत असतो या जातीचा अश्व राजस्थानातील रौतागडच्या सिध्दार्थसिंग रोहत यांच्याकडे होता. अश्वामुळे या राज्यानी अनेक जिंकले होते. या जातीचा एक हा हिंदी चित्रपट सृष्टीतील सलमान खान यांच्याकडे आहे. त्या गॅबलर या नावाच्या अश्वाचा मुलगा हा "बगीरा" आहे. याची उंची ६५ इंच असुन तो केवळ बत्तीस महिन्याचा आहे.
तो दोन दातावर असल्याने त्याच्यातील रुबाबदार बाणा, बहरदार शरिरयष्टी यामुळे तो या माळेगाव यात्रेत विशेष आकर्षण ठरला आहे. दि ११ रोजी झालेल्या पशुधन स्पर्धेत त्याला दोन दाताच्या गटात पारितोषीक देवुन गौरविण्यात आले. त्याबदल अश्वाचे मालक अनुज अडकटलवार यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्यासह पशुधन विकास अधिकारी डॉ सुनील गिरी आणि गुट्टे, निखिलेश देशमुख, आश्विन पवार, वासुदेव भोसले, प्रणव सोवठे यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला. हा अश्व बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अनुज अडकटलवार हे नायगाव येथील चन्नावार  परिवारातील जावई आहेत मंजुवाले यांच्या अश्वाला माळेगाव यात्रेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांच्या चाहत्या वर्गाकडून व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !