आणखी 10 लाख रुपये किमतीची कामे प्रगती पथावर - सरपंच जनाबाई तरटे
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पळवे खुर्द ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेल्या विविध कामांचे लोकार्पण पार पडले. यामध्ये बारगळ वस्तीवरील अंतर्गत 4.5 लाख किंमतीची गटार लाईन, 1लाख 20 हजार रकमेचे जिल्हा परिषद शाळेची राळा घोटाई , 50 हजार रु. चे अंगणवाडी समोरील पेव्हिंग ब्लॉक या कामाचा समावेश असून अजून आर्थिक वर्षातील 10 लक्ष किमतीची कामे प्रगती पथावर असून त्याचेही लवकरच लोकार्पण होणार असल्याची माहिती सरपंच जनाबाई तरटे यांनी दिली.
या वेळी बाबाजी गाडीलकर,रावसाहेब बारगळ, रमेश शेळके,रोहिदास नवले,वसंतराव देशमुख,संजयजी तरटे,सेवा सोसायटीचे चेअरमन अंबादास तरटे मेजर,विजय शेलार, राजेंद्र शेलार,नानाभाऊ गाडीलकर प्रसाद भाऊ तरटे,बाळू जाधव भिमाजी शेळके मेजर भानुदास बारगळ पोपट इरकर पोपट बारगळ शांताराम तरटे मेजर पोपट पाचरणे दुधीनाथ देशमुख अशोक गवळी राजेंद्र शेळके शांताराम देशमुख नारायण गाडीलकर संदीप देशमुख सचिन बारगळ अमोल तरटे नंदकुमार तरटे अमोलशेठ शेळके यांच्यासह गावच्या सरपंच श्रीमती जनाबाई तरटे उपसरपंच अमोल जाधव मा. उपसरपंच संजय नवले सौ.संगीता शेलार मा.सरपंच सौ.सरिता जगताप,रमेशनाना पाचरणे,दत्तागाडीलकर,सौ.बायजाबाई इरकर,सौ.कविता गाडीलकर आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेविका सौ.अवधूत मॅडम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा