संघटन कौशल्य वापरून संघटना वाढवणार - दत्ता बन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या नांदेड जिल्हा लोकसभा संयोजक पदी नायगाव तालुक्यातील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते दत्ता दत्ता बन होटाळकर यांची नुकतीच निवड करण्यात आल्याचे पत्र राज्याचे कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी दिले असून या निवडीबद्दल दत्ता बन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नायगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या दत्त आनंद बन यांनी गेल्या वीस वर्षापासून पक्षाचे काम करीत असताना त्यांनी अनेक निवडणुकात सक्रिय सहभाग नोंदवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणल्याचे सांगितले जाते. याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी दत्ता आनंद बन होटाळकर यांची भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या नांदेड लोकसभा संयोजक पदी नियुक्ती केली आहे.
त्यांनी आपले संघटन कौशल्य वापरून विभागात कामगार मोर्चाचे संघटन वाढवणे ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त श्रमिकांना भाजपामध्ये सामील करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आनंद बन होटाळकर यांच्या निवडी बद्दल भाजपाचे बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, माणिक लोहगावे, सुभाष पेरकेवार, गोविंद नरसीकर आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा