महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील हजारों दादाजी भक्त राहणार आहेत उपस्थित
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
भारत भूमी ही संतांची भूमी असून, जनकल्याणार्थ अनेक ईश्वरी होती या भूमीमध्ये अवतरलेल्या आहेत आणि काल परत्वे त्यांनी जनकल्याण साधत सनातन धर्माची पताका फडकत ठेवली आहे श्रीमद आद्य शंकराचार्य व श्री धुनीवाले दादाजी, खंडवा यांच्या श्रेष्ठ गुरुपरंपरेत शोभून दिसणारे रत्न म्हणजे आद्य परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे येथील मूळ रहिवासी असलेले आद्य परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी हे हरिद्वार आणि ऋषिकेश तसेच हिमालयातील अनेक महात्म्यांचे गुरुस्थानी आहेत. ध्यान योग साधना, कुंडलिनी जागृती साधना, सप्तचक्र जागृती साधना, तृतीय नेत्र जागृती साधना, शिकवण्यासाठी आद्य परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी हे सर्वत्र सुविख्यात आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वादाने शुक्रवार दि. 19 ते रविवार दि. 21 पर्यंत तीन दिवसीय भव्य ध्यानधारणा शिबिर कै. समानताई ढाकणे प्रतिष्ठान ता. पाथर्डी जि.अहमदनगर येथे आद्य उपक्रम कार्यान्वयन समिती तर्फे आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी सर्व जिज्ञासू साधकांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा व उच्च कोटीचे दिव्य आध्यात्मिक अनुभव प्राप्त करून घ्यावेत असे आवाहन ओम आद्य स्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.आद्य स्वामी शिवानंद दादाजींनी ध्यान धारणे विषयी माहिती देताना सांगितले की ध्यान धारणेमुळे ताणतणावापासून मुक्तता मिळते तसेच आपले आरोग्य चांगले राहते आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे अध्यात्मिक मार्गात आपली प्रगती होते तसेच मन नेहमी प्रसन्न राहते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्यामुळे आपले मन शांत राहते.
आपले आत्मकल्याण होते. तसेच या ठिकाणी निवृत्ती लोंढे, बबनराव खेडकर, आमोद नलगे सर, शिवाजीराव लोंढे, संजय डहाळे, शेखर कुलकर्णी, जगन्नाथ जाधव, भास्कर कापरे, कृष्णा जंजिरे, बाळासाहेब झाडे, संतोष मेहेर, सुरेश कुताळ आदींशी साधकांनी संपर्क साधावा या ठिकाणी चहा पाणी नाश्ता महाप्रसाद तसेच पार्किंगची व्यवस्था चूक ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती ओम आद्य स्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री श्री महान 1008 धुनीवाले धनंजय सरकार जी यांच्यामार्फत होणार आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा