पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावर वेळे व जोशिविहीर नजीक दोन ठिकाणी दोन दुचाकीस्वार मालट्रकला धडकल्याने दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. जोशिविहीर येथील अपघात सोमवारी दि. 18 रोजी रात्री साडेसात वाजता झाला,तर वेळे येथील अपघात मंगळवारी सकाळी 7.30 ते 8.00 च्या दरम्यान झाला आहे. जोशिविहीर येथील अपघातातील मृताचे नाव योगेश पांडूरंग जगताप वय ४८ रा.जगतापवाडी सोनके ता.कोरेगाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जोशिविहीर येथील उड्डाणपूलावर बंगळूरकडे जाणारा मालट्रक नादुरुस्त झाल्याने तिसऱ्या लेनवर उभा होता. दरम्यान सोनके येथून सोळशी,वेळे, कवठेमार्ग भुईंजला येत होते. कवठे येथे आल्यावर सात वाजता त्यांचा पत्नीशी मोबाईलवरुन संपर्क झाला होता. यानंतर काही मिनिटातच त्यांच्यावर काळाने घाला घातला.समोर उभ्या असलेल्या मालट्रक वर त्यांची दुचाकी जोरदार आदळली. दुचाकी ट्रकवर आदळल्याने दुचाकी व ते मधल्या लेनमध्ये पडल्याने त्यावेळी मागून येणारे अज्ञात वाहन त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने ते गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले. अपघातानंतर भुईंज पोलिस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरू केली. अपघात स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.
दरम्यान आज सकाळी साडेसात वाजता वेळे गावच्या हद्दीत महामार्गावर एका हाॅटेलसमोर महिंद्रा पिकअप टेम्पोला दुचाकी क्र. एम एच १२ सीपी ८८९१ ही पाठीमागून धडकल्याने शिरगाव ता.वाई येथील दुचाकीस्वार ठार झाला तर एकजण जखमी झाला आहे. शाम धनंजय वाईकर वय २१ वर्षे असे मृताचे नाव आहे.तर आकाश अशोक भोसले वय २६ वर्षे दोघे रा.शिरगाव ता.वाई हा गंभीर जखमी आहे त्याच्यावर सातारा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिंद्रा पिकपचा चालक प्रवीण तानाजी धुमाळ वय 27 यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दोन्ही अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे करीत आहेत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा