धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विक्रमी नोंद
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील धोम व बलकवडी धरण क्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळेच धोम धरणातून 14,510 क्यूसेक तर बलकवडी धरणातून 8,000 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे.
या पावसामुळे धरण परिसरात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, 1 जुलैपासून बलकवडी धरण क्षेत्रात आतापर्यंत 2,116 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर धोम धरण क्षेत्रात जुलै महिन्यापासून आतापर्यंत 539 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
धोम आणि बलकवडी धरण क्षेत्रासह संपूर्ण पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये रस्ते वाहतुकीसाठी किरकोळ अडथळा निर्माण झाला आहे,
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीकाठच्या गावांमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा