पुण्यात जागोजागी वाहतूक कोंडी - जनजीवन विस्कळीत
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी पारस मुथा)
पुणे शहर व घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे, तुडुंब भरून वाहत आहेत. त्याचबरोबर शहरातील बहुतांश रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी भरलेले असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचा वाहनधारकांना अंदाज येत नाही. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात होत आहेत.
रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर पाण्यामुळे रस्त्यात दिसत नसल्याने आणि वाहतुकीची गती मंदावल्याने शहरात सगळीकडेच वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. कामाला जाण्याची घाई असलेले नागरिक नाईलाजाने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून आपली वाहने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अनेक ठिकाणी वाहने बंद पडण्याचे प्रकार देखील होत आहेत. एकंदरीत सततच्या मुसळधार पावसाने पुण्यासारख्या शहराचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत केले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा