वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर करणार मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथील शिवाजी सभागृह देशमुख येथे लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने 27 ते 29 जानेवारी दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 27 जानेवारी रोजी व्याख्याते केशव शेकापूरकर अनुचित जाती आरक्षण वर्गीकरण वास्तव या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
28 जानेवारी पुणे येथील प्राध्यापक डॉक्टर संभाजी बिराजे मातंग समाजाच्या प्रगतीमधील अडथळे, कारणे आणि उपाय या विषयावर संशोधन करणार आहेत. तर 29 जानेवारी रोजी एडवोकेट वैशालीताई डोळस बहुजन समाजातील अंधश्रद्धा, आजचे स्त्री जीवन, आणि भविष्यातील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानमालेदरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा