आदेशाचे उलंघन केल्यास दोषींवर दंडात्मक कारवाई होणार
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली शहरात मकर संक्रांत सण हा सामाजिक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या सणानिमित्त शहरात महिला एकमेकांना वाण वाटप करतात.तसेच तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत तिळगुळ सुद्धा वाटप करतात.सदर सणाचे एक सामाजिक महत्व असून या दिवशी तरुण,लहान मुले,नागरिक मोठ्या प्रमाणात पतंग उडवतात.या निमित्ताने अनेकांनी पतंग मांज्याचे दुकान थाटले त्यामध्ये चीनी मांजाची विक्री होत असल्याने पथकाने अनेक दुकानाची चौकशी करून तपासणी केली.
कारण सदर चीनी मांजा हा प्लास्टिक / सिंथेटिक पासून बनविलेला असतो मांज्यामुळे पक्षी व मानवी जीवितास दुखापती होत असल्यामुळे अश्या मांज्याच्या वापर, विक्रीस प्रतिबंध घालण्याबाबत राष्ट्रीय हरित लवाद, पर्यावरण संरक्षण कायदा, अधिनियम, 1986 च्या कलम 5 अन्वये पक्षी व मनुष्यास इजा करणाऱ्या नायलॉन मांजाच्या वाहतूक, विक्रीस, साठवणूक व वापरास प्रतिबंध घालण्याचे निर्देश असून नायलॉन मांजा विक्री/ साठवणूक व वापरणे याबाबत दोषी आढळल्यास दंडात्मक तथा फौजदारी कारवाई ची तरतुद असून नगर परिषद हद्दीत कोणाही नायलॉन मांजाच्या वाहतूक, विक्रीस, साठवणूक व वापरास प्रतिबंध घालण्यात आलेल्या आदेशाचे उलंघन केल्यास दोषींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी हिंगोली नगर परीषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी दोषींवर कारवाई बाबत सक्त ताकीद देण्यात आली होती.
या अनुषंगाने नगर रचना सहायक किशोर काकडे,स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर,शहर समन्वयक आशिष रणसिंगे,दिनेश वर्मा,विजय शिखरे,अमरसिंग ठाकूर,माधव सुकते,संजू गायकवाड,झिंगराजी वैरागड,अफसर खान पठाण,कुणाल कांबळे,आकाश गायकवाड,चेतन भूजवने नगर परिषदेच्या पथकामार्फत अनेक दुकानांची चौकशी करून तपासणी करण्यात आली होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा