शेकडोंच्या संख्येने भाविक निघाले शिर्डीला
शिवशाही वृत्तसेवा , पारनेर जिल्हा प्रतिनिधी सुदाम दरेकर
गुरुवार दिनांक 18 रोजी श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती ते शिर्डी जाणाऱ्या पाय दिंडी सोहळ्याचा विसावा पळवे खुर्द मठवस्ती येथील श्री सद्गुरु माळी बाबा मंदिर या ठिकाणी घेतला या ठिकाणी प्रथम साईबाबांच्या प्रतिमेचे व पादुकांचे पूजन करण्यात आले. नंतर या ठिकाणी पळवे खुर्द मठ वस्ती येथील भजनी मंडळाचा साई नामाचा भजनाचा कार्यक्रम झाला. साईनामाने परिसर दुमदुमून गेला. तब्बल दोन तासाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणी जिल्हा अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर, श्री सावळेराम दरेकर,
श्री विठ्ठल गाडीलकर, श्री जालिंदर गाडीलकर यांच्यावतीने पालखीतील भक्तांना फराळ तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हे पालखी सोहळ्याचे नववे वर्षे असल्याचे अध्यक्ष दिलीप लोखंडे, उपाध्यक्ष सचिन पाबळे, कार्याध्यक्ष गणेश लोखंडे, संतोष लोखंडे, कार्याध्यक्ष नवनाथ दाभाडे रांजणगाव गणपती यांनी दिली. नंतर लगेच हा पालखी सोहळा सुपा या ठिकाणी निघाला. मुक्काम करत करत हा पालखी सोहळा बुधवार दिनांक 24 पर्यंत शिर्डीला पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा