maharashtra day, workers day, shivshahi news,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आखाडा बाळापूर येथे शिवसेनेचा शिव संकल्प कार्यकर्ता मेळावा

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे खासदार हेमंत पाटील यांचे आवाहान
Shiv Sankalp Worker Meeting , Chief Minister Eknath Shinde , Hingoli , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रभर झंझावाती दौरे आयोजित करण्यात आले असून, त्यानुसार संपूर्ण राज्यभर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत  हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या संकल्प मेळाव्यास उपस्थित राहावे असे खासदार हेमंत पाटील यांनी आवाहन केले.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा  बाळापूर येथील नांदेड - हिंगोली रोडवरील सीड फार्म जवळ बुधवारी (दि.१०) रोजी दुपारी १ वाजता ही भव्य सभा होणार असून, या सभेसाठी हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सर्व गाव, सर्कल निहाय शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे खासदार हेमंत पाटील व मराठवाडा संपर्कप्रमुख आनंदरावजी जाधव, आमदार संतोष बांगर यांनी आव्हान केले. शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने सोमवार (दि.८) रोजी हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना मराठवाडा विभागीय संपर्क नेते आनंदराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,  महिला आघाडी व इतर अंगीकृत संघटनेची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस हिंगोली जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, उपजिल्हाप्रमुख पिंटू पतंगे कांडलीकर, तालुकाप्रमुख धनंजय सुर्यवंशी दातीकर, राजू चापके, साहेबराव देशमुख, प्रताप काळे, रामप्रसाद घुगे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखाताई देवकाते, शहर प्रमुख अनिल देव, प्रभाकर शिरसागर, बबलू पत्की, संजय बोंढारे, केशव नाईक, एडवोकेट संतोष राठोड, महिला आघाडी कळमनुरी शहरप्रमुख लक्ष्मीताई गाभणे, एडवोकेट पंजाब चव्हाण, दत्ता बोंढारे, सचिन पेंढारकर, नगराध्यक्ष प्रदीप कनकुटे, नगरसेवक अनिल भाई देशमुख, मनोज देशमुख, राहुल दंतवार, दिलीप राठोड, विष्णू पवार, शंकर यादव, किसन बापू कोकरे, फारुख बागवान, लखन शिंदे,  राजू पाटील, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !