11 ते 15 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी महोत्सव
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांच्या सहकार्याने अभिता ऍग्रो इंडस्ट्रीज आयोजित भव्य राज्यस्तरीय कृषी महोत्सव अभिता ऍग्रो एक्सपो 11 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 मातोश्री लॉन्स बाजूला मेहकर रोड सिंदखेड राजा येथे होणार आहे त्या जागेची पाहणी करण्यासाठी अभिता ऍग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक सुनील शेळके यांनी तारीख 7 जानेवारी रोजी केली त्यांनी जागेची पाहणी करून कृषी महोत्सव यशस्वी करण्यासाठी जोरदार नियोजन केले आहे.
या कृषी महोत्सवामध्ये पेरणी ते कापणी पर्यंत पिकाची संपूर्ण माहिती तज्ञाची पिक विषयक चर्चासत्र कार्यशाळा सौर ऊर्जेवरील उत्पादनाचे स्वतंत्र दालन 13 जानेवारी 2024 रोजी कृषी रत्न प्रगतशील शेतकरी सत्कार समारंभ 14 जानेवारी 2024 रोजी भव्य पशुपक्षी प्रदर्शन १३ जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण गाई म्हशी बैल वळु राहणार आहे
शेतकरी हाच केंद्रबिंदू मानुन शेतीच्या दैनंदिन गरजा आणि प्रश्नांची उकल होण्यासाठी मातोश्री लॉनच्या बाजुला सिंदखेड राजा जि. बुलढाणा येथे कृषि विभाग महाराष्ट्र शासन, कृषि विज्ञान केंद्र व संलग्न संस्था यांच्या सहकार्याने अभिता अॅग्रो एक्स्पो २०२४ या राज्यस्तरीय भव्य कृषि प्रदर्शनीचे आयोजन केले आहे.
नवनविन संकल्पना आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करणे आता अगदी अनिवार्य ठरले आहे आणि शेतकरी बंधु त्यांचा स्विकार ही करु लागले आहेत. तसेच व्यावसायिक संधीची माहिती देण्याचा कृषि प्रदर्शनीचा प्रयत्न आहे. आधुनिक शेती करीत असलेल्या भागातील भव्य कृषि प्रदर्शन आणि राष�
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा