८ जानेवारीपासून ते ३० जानेवारी पर्यंत स्वच्छता जनजागृती
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
सवना या गावात ८ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत दररोज साफसफाई होणार असून या गावातील महिलांनी रोज दोन तास साफसफाईसाठी वेळ द्यावा, अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे. गावातील प्रत्येक महिलांनी स्वच्छता करावी. आपलं गाव स्वच्छ गाव राहिले पाहिजे असे सवना येथील महिलांनी ठरवले आहे. ८ जानेवारीपासून ते ३० जानेवारी पर्यंत स्वच्छता जनजागृती केल्यामुळे सवना येथील महिलांचे कौतुक होत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीताई वानखेडे, मंदाताई वानखेडे, शारदाताई वानखेडे, चंद्रभागा शिंदे, सुनीता शिंदे, अर्चना वानखेडे, लक्ष्मीबाई खंडारे, मीराबाई गावंडे, अशा गावातील शेतमजूर महिलांनी व पुरुषांनी आपलं गाव स्वच्छ राहण्यासाठी प्रत्येक दिवशी एक ते दोन तास साफसफाई करण्याचे ठरविले आहे आणि सर्वांना आवाहन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा