maharashtra day, workers day, shivshahi news,

अबब.. ! चोरट्यांना पोलिसांचा धाकच नाही !

बिबी पोलीस ठाण्या जवळीलच हॉटेल फोडले
Unknown persons broke Mauli Hotel , Thieves are not afraid of police , Sindkhedaraja , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
लोणार तालुक्यातील बिबी येथे ६ जानेवारीला मध्यरात्री अज्ञातांनी माऊली हॉटेल फोडले. यामधून तब्बल १७ हजार रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरच हॉटेल आहे. त्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक आहे की नाही ? असा सवाल चर्चेतून होतो आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर हॉटेल मालक ज्ञानेश्वर भोकरे यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.द.वि कलम ४६१/३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोडक्यात घटनाक्रम असा की, ६ जानेवारीच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी माऊली हॉटेलचे टाळे फोडले. त्यानंतर गल्ल्यामधील नगदी रोख रक्कम (१७ हजार) चोरी केली. इतकच नाही तर हॉटेलमधील महागडे सामान व पदार्थांची देखील नासधूस करण्यात आली. 
अलीकडे बीबी परिसरात धाडसी चोरीची ही दुसरी घटना आहे असे कळते आहे. त्यामुळे पोलिसांचा चोरट्यावर धाक राहिला नाही! अशी चर्चा परिसरात सुरू आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४६१/३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ दिनेश चव्हाण करत आहेत.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !