नायगाव तालुक्यात आनंद, सर्व स्तरातून कौतुक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव आ.भा.ब्रा.महासंघाचे तालुका अध्यक्ष गंगाप्रसाद दिवानजी नायगावकर यांचे भाचे गौरव गंगाधरराव भोसीकर यांची 43 व्या ऑल इंडिया राजीव गांधी 19 वर्षाखालील टी - २० क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली असून दिनांक 18 ते 21 जानेवारी रोजी हैद्राबाद येथे ही स्पर्धा होणार आहे.
या टूर्नामेंट मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या श्रीलंका, हरियाणा, तामिळनाडू ,कर्नाटक, बेंगलोर महाराष्ट्र, बिहार ,विदर्भ येथील टीम सहभागी होणार आहेत. या चॅम्पियनशिप करता गौरव भोसीकर यांच्या निवडी बद्दल नांदेड अ.भा.ब्रा.महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा व्हाईस आ्फ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरमकर, पत्रकार संघाचे मराठवाडा सचिव सुनील रामदासी, युवा जिल्हाध्यक्ष प्रज्योत कुलकर्णी, शामराव कुलकर्णी, विश्वनाथ नायगावकर, मंगेश देशपांडे, पत्रकार सुनील देसाई, संजय पा.चव्हाण, तिरुपती पा.चव्हाण, रमेश पा.शिंदे, कृष्णा हरगे, आदींनी निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा