औढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे पारंपारिक बियाणे महोत्सव संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली), दि. 19 : महाराष्ट्र आर.आर.ए नेटवर्क,नागपूर आणि आर.आर.ए. नेटवर्क, हैद्राबाद व उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा जि. हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 जानेवारी, 2024 रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे आदिवासी समाजातील शेतकरी महिला व पुरुषांसाठी पारंपारिक बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विज्ञान शाखेचे विषय विशेषज्ञ प्रा. राजेश भालेराव आणि आर. आर. ए. नेटवर्क वर्धा येथील अनिकेत लिखार होते. यावेळी गंगाधर इंगोले, सौ. सुशीला पाईकराव, सरपंच सौ. रत्नकला संजय भुरके, बालाजी नरवाडे, कलावती सवंडकर आदींची उपस्थिती होती .
या कार्यक्रमास आमदरी, राजदरी, सोनवाडी आणि पिंपळदरी येथील आदिवासी समाजातील 113 शेतकरी महिला व पुरुष उपस्थित होते. या सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्याकडील पारंपारिक बियाण्यांचे संकलन, जोपासना, वाढ व संवर्धन करुन पारंपारिक बियाणे बँक स्थापन करुन परिसरातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करुन देण्याचा संकल्प जाहीर केला. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रमाचा लाभ या सर्व शेतकऱ्यांना मिळवून देता येईल असे प्रा. राजेश भालेराव यांनी यावेळी सांगितले. तर या चारही गावातील 750 आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एक हेक्टर जमिनीवर पारंपारिक बियाणे वापरुन शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने 400 शेतकऱ्यांचे शेतातील मातीचे नमुने तपासून त्याप्रमाणे मातीच्या आरोग्य सुधारणाचे प्रयत्न केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पिंपळदरी येथील कैलास डुकरे, संजय घोंगडे, किशन कांबळे, किशन बर्गे, पिंटू गुहाडे, आप्पाराव कराळे, चांदू मोरे, तातेराव रिठे, महेश ठोंबरे, आनंदराव इंगोले, तुकाराम भगत, नामदेवराव रिठे, दिशांत पाईकराव, दत्तराव भोयर, आकाश मोगले यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम मोतीपवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगाधर इंगोले यांनी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा