मुंबई पायी वारीसाठी स्वयंसेवक रवाना
शिवशाही वृत्तसेवा , हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली (प्रतिनिधी)- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि.२० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथुन मुंबईकडे पायी वारी सकाळी ९ वाजता निघणार आहे. या पायी वारीत कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, आ.बाळापुर, वडगाव, डोंेगरकडा परिसरातील मराठा स्वयंसेवक अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन स्वयंसेवकांचे प्रस्थान झाले आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीतुन सरसकट मराठा आरक्षण या करिता शनिवार दि.२० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथुन मुंबईकडे लाखोच्या संख्येने पायी दिंडी निघणार आहे. हिंगोली जिल्हयातुन या दिंडीमध्ये गावा-गावातुन लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने पायी वारीसाठी स्वयंसेवक म्हणुन कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा, आखाडा बाळापुर, वडगाव, डोंगरकडा परिसरातील मराठा बांधव आपल्या वाहनाने स्वयर्ंस्फुतीने शुक्रवार दि.१९ जानेवारी रोजी निघाले आहेत.
हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात मराठा सेवकांचे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी आरक्षण मिळवणारचं असा ठाम निर्धार करीत एक मराठा एक लाख मराठा घोषणा देत परिसर दणाणुन सोडला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा