डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली:संपूर्ण बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे कोणालाही शक्य नाही, जसं जसं आपण शोधत गेलो तसे तसे ते सापडतात इथे बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान,लोकशाहीचा अधिकार,रक्ताचा एक थेंबही न सांडवता केलेली धम्मक्रांती व स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष समजून घेणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन इंजि.नारायण जाधव येळगावकर यांनी केले.
हिंगोली येथे बौद्ध संस्कृतिक मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे,दि.१८ जानेवारी गुरुवार रोजी द्वितीय पुष्प गुंफण्यात आले,यावेळी अध्यक्षस्थानी ॲड.एल.आर .साबळे हे होते.
बाबासाहेब समजून घेताना या विषयावर व्याख्याते नारायण जाधव यांनी काव्य ओळी व व्याख्यानाच्या माध्यमातून तब्बल दीड तास बाबासाहेब समजून देण्याचा प्रयत्न केला,पुढे बोलताना नारायण जाधव म्हणाले की,बाबासाहेबांचे प्रत्येक लढे व चळवळ प्रेरणादायी आहे , परंतु बाबासाहेबांनी शेवटच्या काळात स्वतःचा देह झिजवून देशाला लोकशाही टिकून ठेवण्यासाठी मौल्यवान असे भारतीय संविधान दिले आहे. या संविधानामुळे देश एक संघ राहुल प्रत्येक जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात यामुळे आपला देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. परंतु दुसरीकडे मात्र संविधान नष्ट करण्यात ची भाषा बोलली जात आहे तेव्हा आंबेडकर वाद्यांनी त्याचा प्रतिकार करणे गरजेचे आहे.
तर दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला आहे त्याला आपल्यातीलच काही लोक विसरत चालले आहेत अंधश्रद्धा,रूढी, परंपरा, देव,धर्म याच जोखंडामध्ये अडकले आहेत विशेषतः युवा पिढी व शिकलेले व आर्थिक संपन्न झालेले लोक यांना अजूनही धम्म समजलेला नाही त्यामुळे बौद्ध धम्माची वाटचाल धोक्यात येत असल्याचेही जाधव यावेळी म्हणाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना जाधव म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना दूरदृष्टी ठेवून केली होती हा पक्ष भविष्यात देशातील मजबूत विपक्ष ठरेल अशी त्यांना अपेक्षा होती परंतु येथील आजची आंबेडकरवादी राजकीय पक्षाची स्थिती पाहून फार वाईट वाटते,आता आंबेडकर वाद्यांनी राजकीय ऐक्य करून कोणत्यातरी एका नेत्या मागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना जाधव म्हणाले की आज येथे विपक्ष मुक्त भारत अशी घोषणा भाजपा करीत आहे.
यामधून देशातील लोकशाही नष्ट करून येथे हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे हे वेळीच सर्वांनी ओळखावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये लोक अशिक्षित व गरीब होते परंतु चळवळ ही गतिमान व श्रीमंत होती परंतु आता मात्र लोक धनवान व उच्चशिक्षित झाले आहेत आणि आंबेडकर चळवळ संपुष्टात येते असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना देशातील लोकशाही तसेच मौल्यवान धम्म आणि राजकीय मजबुतीकरण करण्याचे आवाहन यावेळी केले. संचलन प्रवीण रुईकर यांनी केले तर आभार इंजि,भीमराव कुरुडे यांनी मांनले, कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशीलाने झाली तर शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. यशस्वीतेसाठी प्रा.डाॅ.शत्रुघ्न जाधव, प्रा.डाॅ.सुखदेव बलखंडे, कैलास भुजंगळे,भीमराव तुरुकमाने, यू.पी.खंदारे,सुभाष भिसे, रमेश खंदारे,प्रकाश इंगोले,प्रा.डाॅ.सचिन हटकर,डॉ.भगवान पुंडगे, बबन दांडेकर,गंगाधर पाईकराव, बाबुराव काळे, प्रदीप इंगोले, आधी उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा