वसंतनाना देशमुख यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथे नागरी सत्कार संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
वसंतनाना देशमुख यांनी आजपर्यंत आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये भिडस्त स्वभाव घेऊनच ते वावरलेले आहेत.
त्यांच्या स्वभावामध्ये कोणाला नाराज न करण्याची ही जी भिडस्त भावना आहे. या भावनेला आता थोडसं बाजूला करून त्यांनी आता निर्भीडपणे राहिलं पाहिजे आणि वागले पाहिजे तरच त्यांना पुढील राजकीय कारकिर्दीमध्ये प्रगती करता येईल. असे विधीतज्ञ उज्वल निकम यांनी वसंतनाना देशमुख यांच्या ६१ समारंभाच्या सत्कार प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उज्वल निकम साहेबांनी आपल्या मनोगत मधून त्यांनी २०२४ मध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी वसंतनाना देशमुख यांनी जाहीर करावी अशीच अपेक्षा व्यक्त केली की काय अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित होते.
यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या शैलीमध्ये कॉलेज जीवन, राजकारणातील जीवन या गोष्टीवर सविस्तर बोलत त्यांनी कासेगाव मधील प्रामाणिक राजबिंडा युवक आपल्या लोकसंग्रहाच्या जीवावर त्यांनी आपले कासेगाव गटामधील राजकीय अस्तित्व आबादीत ठेवण्याचे कार्य केले. पैशापेक्षा जनतेच्या प्रेमाला त्यांनी महत्त्व दिले. असे उद्गार वसंतनाना देशमुख यांच्या बद्दल काढले. ते पुढे बोलताना म्हणाले की आज पंढरपूर तालुक्यांमध्ये विधानसभेसाठी असंख्य लोक इच्छुक असलेले दिसून येत आहेत. पवार साहेबांच्या कडेने रिंगण घालू लागलेले आहेत. आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये शरद पवार यांच्याकडेने असंख्य रिंगण घातले परंतु काय उपयोग झाला नाही. म्हणून आम्ही शिवसेना,भाजपाला जवळ केले. असा सल्ला यावेळी उपस्थित नेतेमंडळींना दिला.
आयुष्यात पैशापेक्षा माणसे कमावणे महत्वाचे - वसंतनाना देशमुख
शेवटी सत्काराला उत्तर देताना वसंतनाना देशमुख म्हणाले की
आयुष्यात राजकारण करीत असताना विरोधक,असो की स्वपक्षीय कार्यकर्ते,नेते असो कधीही दुजाभाव केला नाही.
आयुष्यात पैश्यापेक्षा माणसे कमावणं महत्वाचे आहे.हे सूत्र मी पाळत गेलो.
लोकांच्या कामासाठी व त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी आपण राजकारणात कार्य करीत राहिलो.पदाचा वापर कधीही गैर केला नाही.लोकांची काम करीतकरीत कधी एकसष्ठी मध्ये आलो हे कळले नाही.लोकांचे प्रेम आणि सहकार्याने आज मी येथे पर्यंत पोहचलो आहे.असेच प्रेम, सहकार्य लोकांचे रहावे.
अशी भावना सत्कारमूर्ती वसंतनाना देशमुख यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके, अभिजीत पाटील आदींनी वसंतनाना देशमुख यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा