भोकरदन येथील श्री राजुरेश्वर मंदिर येथे स्वच्छता अभियान !
शिवशाही वृत्तसेवा, जालना जिल्हा प्रतिनिधी, मुस्तफा खान पठाण
भोकरदन तालुक्यातील राजूर येथील श्री राजुरेश्वर मंदिर व परिसरात "स्वच्छ तीर्थक्षेत्र अभियान" अंतर्गत केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या समवेत स्वच्छता मोहीम राबवली.
अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार असून या शुभ मुहूर्तावर राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. या अनुषंगाने पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात 14 ते 21 जानेवारीपर्यंत मंदिरे आणि धार्मिक स्थळावर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियाना अंतर्गत धार्मिक आणि पवित्र स्थळे स्वच्छ आणि कचरामुक्त करण्यात येणार आहे. याप्रसंगी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा