मोडी लिपीत उपलब्ध आहेत कुणबी नोंदी
पंढरपूर तहसील कार्यालयामधील रेकॉर्ड रूम मध्ये खेडभोसे गावातील तब्बल 249 नोंदी या मोडी लिपीत आढळून आल्या आहेत. त्यामुळे खेडभोसे गावातही मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडण्याची आशा पल्लवीत झाली असून प्रशासनाने भाषांतरित नोंदी लवकरात लवकर प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी खेडभोसे ग्रामस्थांनी केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये मोडी लिपीतील कुणबी नोंदीचे सर्व अभिलेख ॲड. सुधीर रानडे, ॲड. अशुतोष बडवे, ॲड.संतोष घाडगे या मोडी लिपी जाणकारांमार्फत तपासलेल्या आहेत. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 51 गावांमध्ये 2,945 इतक्या मोडी लिपीतील कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. त्यात खेडभोसे गावातही मोडी लिपीतील नोंदी आढळून आल्या आहेत. या नोंदीची पडताळणी करून त्याची माहिती गाव स्तरावर देण्यात यावी, अशी मागणी नायब तहसीलदार यांच्याकडे माजी सरपंच दिलीप पवार, समाजभूषण बंडू पवार, विजय पवार प्रहारचे समाधान पवार राजकुमार पवार यांच्यासह ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा