कार्यकर्त्यांच्या जिल्हास्तरीय समन्वय महामेळाव्यात रामदास पाटील सुमठाणकर यांचे प्रतिपादन
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सहभागी १५ घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समन्वय करून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय समन्वय महामेळावा हिंगोली शहरात मधूरदीप पॅलेस येथे पार पडला.
आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने हिंगोली लोकसभेतील महायुती संघटना बांधणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.येणाऱ्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षाची वाटचाल कशी असेल याविषयी सविस्तर चर्चा झाली.
आपल्या हिंगोली जिल्ह्यात साधारणतः १०१५ बूथ आहेत.ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी कडून त्या बूथ वरील बूथ प्रमूख असेल बूथ समिती असेल,त्या बूथ वरील प्रभावी लोकं असतील यांना संपर्कात ठेवत बूथ बांधणी मजबूत केली आहे.याचं पद्धतीने महायुती मधील सर्व पक्षांनी प्रत्येक बूथ वरील प्रमुख तसेच प्रभावी लोकं असतील यांना संपर्कात ठेवत संघटन मजबूत केले पाहिजे कारण आपल्याला प्रत्येक बूथ वर ५१% ची लढाई लढायची आहे. प्रत्येकाने आपापला बूथ सांभाळला पाहिजे प्रत्येक बूथ वर ५१% मतदान घेणं ही काळाची गरज आहे.
ज्या बूथ वर आपण ५०% पेक्षा कमी आहोत.त्या बुथवर महायुतीतील सर्व पक्षांनी लक्ष देणं आवश्यक आहे. जिल्ह्यातील एकही बूथ हा ५१% पेक्षा कमी राहू नये यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सूचना या निमित्ताने दिल्या.
आपली महायुती ही सामान्यांना न्याय देणारी असून महायुती मजबुतीसाठी सर्व पक्षीय युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कुठलेही हेवेदावे न ठेवता प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांनी केले."
आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांत देशासह राज्याच्या विकासासाठी 'महाविजय २०२४' या कार्यक्रमांतर्गत हिंगोली शहरात महायुतीचा मेळावा पार पडला. येथील मेळाव्यात रामदास पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले मोदी सरकारने केलेल्या विकास कामाची माहिती सर्व स्तरावर पोहोचविणे आणि देशाला एक बलशाली राष्ट्र बनवणे या निमित्ताने सुरू असलेला प्रवास हा तळागाळार्यंत पोहोचला पाहिजे.
विकासाभिमुख योजनांचा धडाका बघून विकास कामांवर विश्र्वास ठेऊन विकासाच्या प्रवाहात अनेक पक्ष जोडल्या जात आहेत.आपल्या सरकार मार्फत राबविल्या जाणाऱ्या अनेक महत्वाच्या योजनांची माहिती,पक्षाचा विचार, ध्येय,धोरणे,विकासकामे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचली पाहिजेत.
आज घडीला केंद्र सरकारकडून विविध विकासकामे मार्गी लावले जात आहेत.सर्वसामान्यांना मदत करण्याची भूमिका नेत्यांची आहे.त्यामुळे यापुढेही आपणही सर्वजण जबाबदारीने काम केले पाहिजे.पक्ष संघटन मजबूत केले पाहिजे.येणाऱ्या सर्व निवडणुकांत महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे असे मत रामदास पाटील यांनी व्यक्त केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा