अयोध्या उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील धडवाई हनुमान मंदिरात २२ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे व साडेबारा ला महाआरती केली जाणार आहे.
तसेच जिल्ह्यातही ठिकठिकाणी घरोघरी पूजन, शोभायात्रा काढली जाणार आहे. शहरातील धडवाई हनुमान मंदिर येथून शोभा यात्रेला सुरुवात होईल, त्यानंतर ही शोभायात्रा गांधी चौक, महावीर स्तंभ, मेडिकल लाईन, सराफा मार्केट, कपडा गल्ली, जलेश्वर मंदिर मार्गे ,गोलनंदाज गल्ली, गणपती चौक ,त्यानंतर गांधी चौक येथे विसर्जन होणार आहे.
मिरवणुकी नंतर दुपारी महाप्रसाद कार्यक्रम होईल. पाच वाजता भजन तर रात्री सात वाजता दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम अयोध्या उत्सव समितीच्या मार्फत केला जात असल्याची माहिती दीपक निमोदिया, राजेंद्र हलवाई, रुपेश मुदीराज, कैलाश श्रीनाथ, धडवाई हनुमान मंदिर चे पुजारी यांनी दिली आहे.या धार्मिक कार्यक्रमाचा जास्तीतजास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन अयोध्या उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा