प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्याकडे केली रक्कम सुपुर्द
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी या ठिकाणी पूर्णा नदी पुला जवळील लॉंगमार्च मैदान उभारणीसाठी डॉक्टर सुनील कायंदे यांनी एकवीस हजार रुपयांचे योगदान दिले आहे. डॉक्टर सुनील कायंदे यांनी लॉंगमार्च चे प्रणेते पिंपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा देऊळगाव राजा येथे सत्कार केला व ऐतिहासिक राहेरी येथील लॉंग मार्च मैदानासमोरील कमान उभारण्यासाठी 21000 रुपये योगदान दिले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा