राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर कार्यशाळा
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालय येथे दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आय क्यू ए सी विभाग व नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड यांच्या संयुक्त विद्यमानाने स्कूल कनेक्ट नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (National Education Policy) यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्री शिवराजभाऊ कायंदे सचिव भगवान बाबा शिक्षक प्रसारक मंडळ रूम्हना हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय नागरे सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. किशोर वळसे संत भगवान बाबा महाविद्यालय सिंदखेड राजा व मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा. डॉ. संजय दांदडे एम ई एस कॉलेज मेहकर हे सुद्धा उपस्थित होते .यासोबतच या कार्यक्रमासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा नाठार मॅडम व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. हेमलता नांदुरकर मॅडम तसेच प्रा. डॉ. गणेश सावजी प्रा. डॉ. श्याम देशमुख हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सचिव शिवराज भाऊ कायंदे यांनी केली यानंतर प्र. कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच प्राचार्य डॉ. किशोर वळसे सर यांनी नवीन शैक्षणिक धोरण संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा. डॉ. संजय दांदडे सर यांनी सुद्धा आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात विद्यार्थ्यांना अवगत केले. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत नवीन शैक्षणिक धोरण संदर्भात सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गणेश घुगे तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा. मिलिंद गवई यांनी केले . याकार्यक्रमासाठी प्रा. भगवान शिंदे प्रा. नयना गवारे प्रा. तमन्ना शेख प्रा. महेश कायंदे प्रा. सत्यम श्रीवास्तव श्री गजानन मुंढे श्री पंढरे श्री अनिल गायकवाड श्री अनिल रणमाळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा