नूतन माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज किनगाव राजा येथे वकृत्व स्पर्धा आयोजित
शिवशाही वृत्तसेवा, आरिफ शेख/ सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी
नूतन माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज किनगाव राजा या ठिकाणी आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धेत सहकार विद्या मंदिर बीबी शाळेच्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकविला.
शारदा साहित्य मंडळाअंतर्गत दरवर्षी या विद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत सहकार विद्या मंदिर बीबी शाळेच्या वर्ग नववीची विद्यार्थिनी कुमारी स्वरा नितीन खेडकर व वर्ग आठवीची कुमारी संस्कृती विजय देशमुख या विद्यार्थिनीनी सोशल मीडियाचे वाढते प्रस्थ व आरोग्य हे श्रेष्ठ धन या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले, व या स्पर्धेत संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकाविला. शाळेचे मुख्याध्यापक श्री तरवडेसर यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षिकावृंदानी अभिनंदन केले असून, विद्यार्थिनींची स्पर्धेसाठी तयारी गीतांजली माळोदे मॅडम व ढाकणे सर यांनी करून घेतली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा